Saturday, December 14, 2019

मी अनुभवलेले गणपती मंदिर...

माझा हा लिखाणाचा पहिलाच प्रयत्न आहे ...
आशा आहे तुम्हाला आवडेल... चुका असल्यास नक्की सांगा ...

मी अनुभवलेले गणपती मंदिर

          विश्वास होता तिला... गणपतीबाप्पा मला कधीच रिकाम्या मनानं अन् हातानं पाठवणार नाही परत त्याच्या घरातून...  कोणीतरी बरेच दिवसांपासून संपर्कात नसणार, कधी काळी किंवा सध्या सुद्धा जिवाभावाचा माणूस नक्की भेटणार या देवलायात...

          जिथं सर्वत्र कोलाहल असून पण शांतता आहे, असंख्य आवाज असूनही स्वतःच्या मनाचा आवाज बुलंद आहे, ज्या समाधानासाठी लोकं झगडतायत, ते आत्मिक समाधान, सुखाचा अन् समाधिस्त अवस्थेचा परमोच्च आनंदाचा बिंदू जिथं हात जोडून स्वागताला आहे, चराचरात गणेश स्तुति चालू आहे असं हे देवालय... जिथं जसं काही सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतात, आणि उत्तरे नाही मिळाली; समस्येचं निराकरण जरी नाही झालं तरी त्याला सामोरं जाऊन जिंकण्याची उमेद निर्माण करण्याचं सामर्थ्य त्या पवित्र वातावरणात समावलय...

          तिची भिरभिरणारी नजर शोध घेतिय, एखाद्या प्रियजनाचा, मनात असणारा विश्वास व्यर्थ जाणार नाही याची खात्री असणारी तिची ती नजर शेवटी पडतेच एखद्या अप्तावर... ख्याली-खुशाली होते; निरोपही होतो अन् पुन्हा मनात समाधान व्यापून राहत... विश्वासाची पोच पावती मिळाल्याचं...

          बंद डब्यात ज्याप्रमाणे मधमाश्या घोंघावतायत, दिशाहीन पणे, भिरभिरणारं उद्देशहिन घोंघवण त्यांचं....
जसं मनातले विचार, चांगलं - वाईट, योग्य - अयोग्य, निश्चितता-अनिश्चितता; त्यांच्यात असणार द्वंद...जे या मधमाशा प्रमाणे घोंगावत आहेत मनात... उद्देश हीन, दिशाहीनपणे... अन ज्यात अनिश्चितता भरून राहिली आहे...

          अगदी सहज सर्वांची उत्तरं मिळतात. अनिश्चितता ठाम निश्चयात परिवर्तित होते, नैतिकतेला अनुसरून असणारी उत्तर ठामपणे मिळतात; जरी उत्तर मिळाली नाही तरी मन शांत करणार समाधान, एक उत्कट शांतता मिळते.

हे तर माझं मंदिर आहे आहे जिथं कोलाहल असूनही शांतता आहे, गर्दी असूनही स्थैर्य आहे, शीतलता आहे...
सकारात्मकतेचा लहरी आसपास दौडत आहेत, प्रत्येक मनावर प्रभाव टाकत आपल्या सकारात्मकतेचा...

....सहज मनात आलं म्हणून